S M L

न्येमार दुखापतीमुळे बाहेर, ब्राझील 'सलाईन'वर

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2014 02:55 PM IST

न्येमार दुखापतीमुळे बाहेर, ब्राझील 'सलाईन'वर

05 जुलै : 'गड आला पण सिंह गेला' अशी वेळ यजमान ब्राझीलवर आलीय. ब्राझीलने फिफा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. शुक्रवारी झालेल्या रोमांचक क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलनं कोलंबियाचा 2-1 नं पराभव केलाय. पण ब्राझीलची शान न्येमार मात्र दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. वर्ल्डकपच्या उर्वरीत मॅचमध्ये न्येमार खेळणार नसल्यामुळे ब्राझीलच्या टीमला चांगलाच घाम फुटला आहे.

पॉर्‍टालिझाला रंगलेल्या या मॅचमध्ये ब्राझीलनं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. कोलंबियानंही आक्रमण करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोन्ही टीम्समध्ये एकप्रकारे वर्चस्वाची लढाई रंगली. या दोन्ही टीम्सकडून अत्यंत बॉडीगेम केला गेला आणि म्हणूनच या मॅचमध्ये तब्बल 54 फाऊल्स झाले. त्यामुळे रेफ्रीचं काम या मॅचमध्ये भलतंच वाढलं. पण अखेर थिऍगो सिल्वानं ब्राझीलसाठी पहिला गोल नोंदवला तर डेव्हिड ल्युईझनं एका अप्रतिम फ्री किकवर दुसरा गोल करत ही आघाडी 2-0 नं वाढवली. दुसर्‍या हाफमध्ये जेम्स रॉड्रिगेझनं पेनल्टीवर कोलंबियासाठी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला खरा.पण हे प्रयत्न अपुरे पडले आणि ब्राझीलनं 2-1 असा दणदणीत विजय मिळवत तब्बल अकराव्यांदा वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीये.

न्येमार 'बिमार'

ब्राझीलनं सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय खरा पण त्याची मोठी किंमत ब्राझीलला मोजावी लागलीये. त्यांचा स्टार प्लेअर न्येमार माणेला फ्रॅक्चर झाल्यामुळे या संपूर्ण वर्ल्ड कपला मुकणार आहे. पायाला आणि माणेच्या फ्रॅक्चरमुळे डॉक्टरांनी न्येमारला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. कालच्या कोलंबियाविरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये कोलंबियाच्या डिफेण्डरशी टॅकल करताना न्येमारला दुखापत झाली. त्यानंतर त्याला साओ कार्लोस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला वर्ल्ड कपला मुकावं लागेल हे स्पष्ट झालंय. त्यामुळे ब्राझीलच्या वर्ल्ड कप कॅम्पेनला जबरदस्त दणका बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2014 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close