S M L

संप मागे घ्या नाहीतर मेस्मा अंतर्गत कारवाई !

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2014 06:43 PM IST

संप मागे घ्या नाहीतर मेस्मा अंतर्गत कारवाई !

rajpatrit_doctor05 जुलै : गेल्या पाच दिवसांपासून रात्रपत्रित डॉक्टरांचं आंदोलन सुरूच आहे अखेर या डॉक्टरांनी उद्यापर्यंत संप मागे घ्यावं असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलंय. संप मागे घेतला नाही तर मेस्मा कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा मेस्मातर्फे देण्यात आला आहे.

कंत्राटी डॉक्टर्सनी माघार घेतली नाही तर उद्यापासून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईनंतर कंत्राटी रिक्त जागा भरण्यासाठी विभागीय पातळीवर प्रक्रियाही लगेच सुरू करू असा इशारा डॉ. सुरेश शेट्टी यांनी दिलाय.

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि कॅबिनेट सचिव यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मॅग्मोचे अध्यक्ष डॉ.राजेश गायकवाड यांची तब्येत बिघडलीय. पण हॉस्पिटलमध्ये जायला त्यांनी नकार दिला आहे.

दरम्यान, सरकारच्या आडमुठेपणामुळे प्रश्न चिघळल्याची तक्रार डॉक्टरांनी केली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या मदतीनं उपचार सुरू होते ते बाल स्वास्थ अभियानाचे डॉक्टर्सही आजपासून या संपात सामील झाले आहेत. सरकारशी असहकाराची भूमिका घेऊन त्यांनीही मेडिकल डॉक्टर्सच्या संपाला पाठिंबा दिलाय. नाशिकमधल्या संपकरी डॉक्टरांनी रक्तदान करून त्यांचा निषेध व्यक्त केला.

रुग्णांचे अतोनात हाल

तर राज्यभरात राजपत्रित डॉक्टरांचा संपामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा डॉक्टरांनी दिलाय. मेस्माच्या कारवाईला देखील जुमानणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. ठाण्यातल्या शासकीय रुग्णालयात ग्रामीण भागातून येणार्‍या रुग्णांना खासगी रूग्णालयात उपचार द्यावे लागत आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे झालेल्या अपघात दोन जण ठार झाले आहे पण ग्रामीण भागातील डॉक्टर संपावर असल्यामुळे उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2014 06:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close