S M L

मद्यधुंद ड्रायव्हरनं 10 जणांना चिरडलं, 2 ठार

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2014 09:45 PM IST

मद्यधुंद ड्रायव्हरनं 10 जणांना चिरडलं, 2 ठार

12amravati_accident05 जुलै : अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्टेशनजवळ एका भरधाव मद्यधुंद ड्रायव्हर 10 लोकाना चिरडले यात एका 16 वर्षाच्या मुलाचा व 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर या मद्यधुंद ड्रायव्हरला जमावाने चांगलाच चोप दिला.

बडनेरा रेल्वे स्थानकाशेजारी आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव कार चालकाने 10 लोकांना चिरडले यात ज्ञानेश भोसले वय 16 व सुशमा प्रमोद भोसले या 5 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले, जखमींना तातडीने येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.

जमावाने कारची तोडफोड केली व वाहन चालक अमर प्रभाकर राठोड याला ही संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला, पोलिसांनी वाहन चालकाला अटक करून वाहन जप्त करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2014 09:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close