S M L

MCCचा उर्वरित विश्व संघावर 7 विकेट राखून विजय

Samruddha Bhambure | Updated On: Jul 6, 2014 03:16 PM IST

MCCचा उर्वरित विश्व संघावर 7 विकेट राखून विजय

7711_306  जुलै : मेर्लबॉन क्रिकेट क्लब म्हणजेच MCC संघाने उर्वरित विश्व संघावर 7 विकेट राखून विजय मिळवला. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्स मैदानाला दोनशे वर्षं पूर्ण झाल्याबद्दल ही वन डे मॅच आयोजित करण्यात आली होती. या मॅचमध्ये MCCचा कॅप्टन सचिन तेंडूलकर तर वर्ल्ड इलेव्हनचा कॅप्टन शेन वॉर्न होता.

उर्वरित विश्व संघाने पहिली बॅटिंग करत 294 रन्स केल्या. त्यानंतर MCC ने 296 रन्स करत मॅच जिंकली. ऍरॉन फिन्च आणि सचिन तेंडुलकर ओपनिंगला आले. सचिनने 44 रन्स केल्या तर फिन्चने 181 रन्स केले. उर्वरित विश्व संघाकडून खेळताना युवराज सिंगनेही 132 रन्स केले. शेन वॉर्न आणि सचिनची लढत पहायला सर्वजण उत्सुक होते पण वॉर्नच्या हाताला दुखापत झाल्याने ही लढत पहायला मिळाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2014 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close