S M L

परस्परांच्या मतदारसंघात पक्षविस्ताराची सेना -भाजपची तयारी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 6, 2014 07:39 PM IST

Mahayuti

06  जुलै :  महायुती म्हणून निवडणूक लढवू असा दावा भाजप आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेते करत असले तरी या दोन्ही पक्षांनी आता एकमेकांच्या मतदारसंघात पक्षविस्ताराची तयारी सुरु केली आहे. दोन्ही पक्षातील तणाव वाढल्याने जागावाटपासंदर्भातील बैठकही खोळंबल्याने महायुतीतील मित्र पक्षांची चिंता वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप - शिवसेनेने पक्षविस्ताराची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ केला आहे. यात शिवसेनेने भाजपच्या मतदारसंघांवर विशेष लक्ष दिले आहे. मलकापूर, खामगाव, अकोला - पश्चिम, अमरावती आणि पूर्व विदर्भातील भाजपच्या मतदारसंघांमध्ये पक्षविस्तार करण्यावर शिवसेना भर देणार आहे. औरंगाबादमधील सर्व मतदारसंघ स्वबळावर लढवू असे विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे. भाजपकडूनही शिवसेनेच्या 150 मतदारसंघांमध्ये पक्षविस्तारकांची नेमणूक केली आहे.

शिवसेना - भाजपमधील वादाचे पडसाद आता महायुतीवर पडू लागले आहेत. महायुतीतील जागावाटपासंदर्भातील बैठक सलग तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. 21, 22 आणि त्यांनतर 24 जुलैरोजी महायुतीची बैठक होणार होती. मात्र तिन्ही वेळेला बैठक पुढे ढकलण्यात आली होती. पुढील बैठकीची तारिख अद्यापही अनिश्चितच आहे. या दोन्ही पक्षांची जागा वाटप न झाल्याने मित्रपक्षांचीही कोंडी झाली आहे.

दरम्यान, महायुती भक्कम राहावी यासाठी मी भाजप - शिवसेना नेत्यांचे पाय धरेन असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी मांडले आहे. तर आजवर कोणालाही स्वबळावर निवडणूक लढवणे शक्य झालेले नाही. त्यामुळे सेना - भाजपने आपआपसातील वाद लवकरात लवकर मिटवावे असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2014 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close