S M L

नाशिक मनसेतला वाद चिघळण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2014 12:25 PM IST

नाशिक मनसेतला वाद चिघळण्याची शक्यता

gite vasant_607  जुलै :   राज ठाकरे यांच्या नाशिक दौर्‍यात मनसेतली नाराजी समोर आली आहे. नाशिकमधले मनसेचे नेते वसंत गीते हे नाराज आहेत. वसंत गीते यांच्या पायाला दुखापत झाल्यानं ते कालच्या बैठकीला गैरहजर होते, असं सांगितलं जात होतं. गीतेंची विचारपूस करून समजूत काढण्यासाठी मनसेचे पदाधिकारी नितीन सरदेसाई आणि दीपक पायगुडे आज त्यांच्या भेटीला गेले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे नाशिक मनसेमधला वाद चिघळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक, स्थायी समिती निवडणूक शहराध्यक्षांची नियुक्ती यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर वसंत गिते,अतुल चांडक आणि सचिन ठाकरे या जुन्या पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर नाशिकच्या पदाधिकार्‍यांवर फोडण्यात आलं. त्यानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून फेरबदल करण्यात आले, संपर्कप्रमुख नेमण्यात आले. या सार्‍यात वसंत गीते बाजूला पडले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या नाशिक दौर्‍याचा आजचा दुसरा दिवस आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते नाशिकमध्ये महापालिकेच्या शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. शहरात ट्राम सुरू होऊ शकते का याची चाचपणी शिर्के ग्रुप ऑफ आर्किटेक्टच्या सदस्यासोबत केली. त्याशिवाय ट्रॅफिक आयलंडच्या कामाचाही त्यांनी आढावाही घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close