S M L

राष्ट्रवादीचे नेते अजित घोरपडे भाजपमध्ये करणार प्रवेश

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2014 03:21 PM IST

राष्ट्रवादीचे नेते अजित घोरपडे भाजपमध्ये करणार प्रवेश

Ajit ghorpade07  जुलै :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तासगाव-कवठे महाकाळ मतदारसंघातून आर.आर.पाटील यांच्या विरोधात आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आर.आर.पाटील विरुद्ध अजित घोरपडे अशी झुंज रंगणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित घोरपडे यांनी भाजपचे संजयकाका पाटील यांचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे तासगाव-कवठे महाकाळ या मतदारसंघातून भाजपच्या संजयकाका पाटील यांना 38 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. अजित घोरपडे यांची उमेदवारी ही आर.आर.पाटील आणि पर्यायाने राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे हे नक्की.

माजी मंत्री अजित घोरपडे यांचा परिचय :

  • अजित घोरपडे हे कवठे महाकाळ मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
  • घोरपडे यांना आक्रमक आणि मास लीडर म्हणून ओळखलं जातं.
  • 1995 मध्ये त्यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा देऊन दुष्काळी भागातील ताकारी-म्हैसाळ योजना सुरू केली.
  • 1999 साली त्यांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला.
  • 2004 साली घोरपडे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. काँग्रेसच्या काळात अजित घोरपडे हे पाटबंधारे राज्यमंत्री होते.
  • 2009 साली बंडखोरी करून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करून कडवी झुंज दिली. अवघ्या 39 हजार मतांनी ते पराभूत झाले.
  • 2009 साली तासगाव आणि कवठे महाकाळ हा एकच मतदारसंघ झाला आणि ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. त्यामुळे अजित घोरपडे निवडणुकीला उभे राहिले नाहीत. यावेळी गृहमंत्री आर.आर.पाटील हे निवडून आले. त्यानंतर घोरपडे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close