S M L

अखेर 'मॅग्मो'च्या डॉक्टरांचा संप मागे

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2014 05:56 PM IST

अखेर 'मॅग्मो'च्या डॉक्टरांचा संप मागे

07 जुलै : गेल्या सहा दिवसांपासून रुग्णांना वेठीस धरुन ठेवणार्‍या मॅग्मोच्या डॉक्टरांनी आपला संप अखेर मागे घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मॅग्मोच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत मेस्मांतर्गत कारवाई झालेल्या डॉक्टरांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर मॅग्मोच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

या डॉक्टरांना कंत्राट तत्वावर घेण्यात आलं होतं. त्यामुळे आमच्या नोकर्‍या कायम करा या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून मॅग्मोचे डॉक्टर संपावर होते. राज्यभरातील तब्बल दहा हजार डॉक्टर यामध्ये सहभागी झाले होते. या संपामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्ण सेवेवर मोठी परिणाम झाला होता. ग्रामीण भागात डॉक्टर संपावर असल्यामुळे रुग्णालयं ओस पडली होती. त्यामुळे रुग्णांना जादा पैसे मोजून खासगी हॉस्टिपटलचा आसरा घ्यावा लागला.

अखेर सरकारने आंदोलनाची दखल घेऊ डॉक्टरांनी संप मागे घ्यावा त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल असं आश्वासन दिलं. पण तरीही डॉक्टरांनी संप सुरुच ठेवला. अखेर सरकारने कारवाईचा बडगा उगारत रविवारी 265 गॅझेटेड डॉक्टरांना निलंबित केलंय. त्यांच्यावर मेस्मानुसार कारवाईही करण्यात आलीय. पण, तरीही डॉक्टरांनी संप मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे या संपावर आज स्थानिक पातळीवर पोलीस स्टेशनमध्ये या डॉक्टरांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान दुपारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close