S M L

तिसर्‍या आघाडीसमोर पंतप्रधानपदासाठी उमेदवार फक्त मायावतीच : पृथ्वीराज चव्हाण

24 एप्रिल आशिष जाधव 15 व्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचंच सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येईल. 'पंतप्रधान पदाचे उमेदवार हे मनमोहन सिंगच असतील. तर तिसर्‍या आघाडीसमोर पंतप्रधानपदासाठी मायावतींशिवाय पर्याय नाही', असं मत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. 'अडवाणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उमेदवार नाहीत पण मायावती पर्यायी उमेदवार ठरु शकतात', असं वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन-लोकमतचे सीनिअर रिपोर्टर आशिष जाधव यांच्याशी खास बातचीत करताना केलं. मनमोहन सिंग यांच्याऐवजी पंतप्रधान पदासाठी कोणाचा विचार करता येईल अशी विचारणा केली असता 2004 पेक्षाही काँग्रेसला या निवडणुकीत हमखास मोठ्या प्रमाणात यश मिळेल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या तरी मायावतींनी माघार घेतली आहे. पण तिसर्‍या आघाडीचा नेता निवडण्यासाठी शरद पवारांकडेही मायावतींशिवाय पर्याय नाही. इतर पक्षांमध्ये वाजपेयी, अडवाणी यांची पंतप्रधान पदासाठी दूरवर शक्यता नसल्याचं सांगून त्यांच्या महाराष्ट्र, पंजाब, आसाम, बिहारमधल्या मित्रपक्षांचं वजनही कमी झालं आहे. तरीही स्वबळावर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिष कुमार, अकाली दल, शिवसेना यांच्या जोरावर अडवाणी यांनी पंतप्रधान पद मिळवण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही, अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी दलित उमेदवाराला पाठिंबा देण्याचा दबाव भाजपकडून घालण्यात येईल. तर तिसर्‍या आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी फक्त मायावतीच पर्याय ठरू शकतात हे काँग्रेसनेही लक्षात घ्यावं, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएनशी बोलताना केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2009 07:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2009 07:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close