S M L

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव श्रीलंका भेटीला

24 एप्रिल, कोलंबो श्रीलंकन लष्कर आणि लिट्टे प्रमुख प्रभाकरन यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूवीर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के.नारायण आणि परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन कोलंबोला रवाना झाले आहेत. श्रीलंकेच्या ईशान्य भागात श्रीलंकन लष्कर आणि लिट्टे प्रमुख प्रभाकरन यांच्यातला संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गावच्या गावं स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे श्रीलंकन सरकारनं मानवतेच्या दृष्टिकोनातून युध्दबंदी लागू करावी ,यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाब वाढत आहे. पण यावर श्रीलंकेत मात्र अंतिम टप्प्यातील युध्द सुरूच राहील अशी ठाम भूमिका श्रीलंकन लष्करानं घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण आणि मेनन यांचा कोलंबो दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2009 05:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2009 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close