S M L

बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल...!!

Samruddha Bhambure | Updated On: Jul 9, 2014 12:20 PM IST

बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल...!!

09   जुलै : आज आषाढी एकादशी... गेल्या महिनाभरापासून विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकर्‍यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि आनंद देणारा आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आज प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली.

हरीनामाच्या जयघोषात विठ्ठल मंदिर दुमदुमलं. यावेळी विठ्ठल रुक्मिणीची यथासांग महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्या दिल्या तर यंदा कर्नाटकातल्या बिदरचे राम आणि प्रमिला शेळके दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. या पूजेने जीवनाचं सार्थक झाल्याची भावना शेळके कुटुंबाने व्यक्त केली.

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर रोषणाईनं उजळून निघालंय. अत्यंत नयनरम्य असं दृश्य पंढरपुरात पाहायला मिळतंय. वारकरी येणार म्हणून सोमवारी रात्रीच ही रोषणाई करण्यात आली आणि कालपासून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले. हरीनामाच्या जयघोषणानं पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2014 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close