S M L

तब्बल 21 लाख मुलांना 'श' शाळेचा माहित नाही !

Samruddha Bhambure | Updated On: Jul 9, 2014 02:06 PM IST

तब्बल 21 लाख मुलांना 'श' शाळेचा माहित नाही !

प्रवीण मुधोळकर, नागपूर

09 जुलै : शिक्षणात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात 'राईट टू एज्युकेशन' अर्थात 'शिक्षण हक्क' कायद्याचा बोजवारा उडाला आहे. आतापर्यंत तब्बल 21 लाख 24 हजार मुले शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती 'संघर्ष वाहिनी' या संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या बाबतीत इतर राज्याच्या तुलनेत प्रगत असल्याचे समजले जातं. सरकारने 'गाव तेथे शाळा' तर शहरामध्ये सरकारी, खाजगी शाळा आण काँन्व्हेंटची संख्या वाढतच आहे असं सांगतात. पण असे असतांना दुसरीकडे मात्र शाळेपासून वंचित राहणार्‍या मुलांची संख्यातही प्रचंड वाढली आहेत.

शासन योजना बनवतं पण त्या योजना कागदावरच राहतात, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीची पावले उचलली जातचं नाहीत. निधी उपलब्ध केला जात नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे. पण शासन आपले कार्य पूर्णपणे करत असल्याच शिक्षण उपसंचालकांचं म्हणणं आहे.

राज्यातील शिक्षण संस्था काढणारे शिक्षणसम्राट मोठे झाले मात्र समाजातील उपेक्षित घटकापर्यंत शिक्षण पोहचलेच नाही. त्यामुळे 'शिक्षणाच्या बाबतीत राज्य अग्रेसर आहे', हा शासनाचा दावा फोल ठरतो. त्या उलट यातून शिक्षणाचे केवळ बाजारीकरण झाले हेच स्पष्ट होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2014 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close