S M L

काँग्रेसशी जुळवून घेण्याचे डाव्यांचे संकेत

24 एप्रिल, मुंबई वेळ पडली तर नव्या सरकारमध्ये सहभागी होऊ अशी नवी डाव्यांची नवी भूमिका पश्चिम बंगालचे मुख्यंमत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी मांडली आहे. आयबीएन नेटवर्कच्या सीएनएन-आयबीएन या इंग्रजी वाहिनीला बुद्धदेव भट्टाचार्य यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बुद्धदेव भट्टाचार्य यांनी डाव्यांची नवी भूमिका मांडली आहे. ' 1996 साली ज्योती बसू यांना पंतप्रधान बनण्यापासून आमच्या पक्षानं रोखलं होतं. पण नंतर या विषयावर आम्ही चर्चा केली आणि ठरवलं की, सरकारमध्ये सहभागी व्हायचंच नाही. पण आतस असं आता आम्ही म्हणणार नाही. आम्ही निर्णय घेतला, की परिस्थितीची गरज असल्यास आणि जर आम्ही एक अर्थपूर्ण भूमिका निभावू शकणार असलो, तर आम्ही काँग्रेस सरकारमध्ये सामील होऊ शकतो, असेही संकेत पश्चिम बंगालचे मुख्यंमत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी दिले. अजून मतदानही पूर्ण झालं नसलं तरी सरकार बनवण्यासाठी जोडतोडीचे प्रयत्न सुरू झालेत. कालच शरद पवार, लालू प्रसाद आणि रामविलास पासवान या यूपीएतल्या तीन महत्त्वाच्या नेत्यांनी डाव्यांना सोबत घ्यायला हवं असं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आता डाव्यांनीही जरा नमतं धोरण घेतलं आहे. काल माकप सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटलं होतं की आम्ही काँग्रेसप्रणीत सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही. पण सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना हरवणं, हे आमचं उद्दीष्ट आहे. आत्ता आम्ही कॉंग्रेसविरोधात निवडणूक लढवत असलो तरी निवडणुकांनंतर चित्र बदलू शकतं, असंही बुद्धदेव भट्टाचार्य म्हणाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2009 05:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2009 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close