S M L

बॉलिवूडची 'दादी' काळाच्या पडद्याआड

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2014 10:03 PM IST

बॉलिवूडची 'दादी' काळाच्या पडद्याआड

zohra_segal10 जुलै : एक जिंदादिल अभिनेत्री म्हणून ओळख असणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचं आज (गुरुवारी) निधन झालं आहे. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 'चिनी कम', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'दिल से', 'बेंड इट लाईक बेकहॅम' या चित्रपटातली त्यांची कामं खूप गाजली. त्यांनी अनेक जाहिरातींमध्येही काम केलेलं होतं.

1998 ला पद्मश्रीनं जोहरा सहगल यांचा सन्मान करण्यात आला होता. त्याचबरोबर कालिदास सन्मान,संगीत अकादमी यासारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. 1935 मध्ये उदय शंकर यांच्या नृत्यपथकात नृत्यागंना म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ज्येष्ठ असल्या तरी जोहरा सेहगल यांनी आजच्या कलावंतांशी स्वत:ला जोडून घेतलं होतं.त्यामुळेच 'वीर झारा','सावरीया', 'हम दिल चुके सनम' या चित्रपटात सगळ्या भूमिकांमध्ये त्यांची भूमिका सगळ्यांच्या लक्षात राहिली.

जोहरा सहगल केवळ चित्रपट या माध्यमापुरताच मर्यादित नव्हत्या तर प्रायोगिक नाटकांमध्येही वेगळ्या भूमिका केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2014 09:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close