S M L

कोल्हापूरमध्ये कैद्याला मारहाण

Samruddha Bhambure | Updated On: Jul 11, 2014 10:15 AM IST

कोल्हापूरमध्ये कैद्याला मारहाण

kolhapur jailour11  जुलै : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये अनिल पवार या कैद्याला जेलमधल्याच काही कैद्यांनी मिळून जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुडाळमधील अनिल पवार हा कैदी आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणी 2003 सालापासून शिक्षा भोगत आहे. फक्त वर्चस्ववाद आणि जेल अधिकार्‍यांच्या पाठिंब्यामुळे पवारला 4 ते 5 कैद्यांनी जबर मारहाण केली आहे.

सध्या अनिल पवार यांच्यावर कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर पवार बेशुद्ध पडला तसंच एक हातही फ्रॅक्चर झालाय. याबाबत पवार यांची मुलगी पोलिसांत तक्रार दाखल करायला गेली पण पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याचा आरोप पवार यांची मुलगी प्रियांकानं केलाय.

वडील आजारी असल्याचं कारण सांगून तिला गावाकडून जेलच्या प्रशासनानं बोलावून घेतलं. पण ज्यावेळी प्रियांका आपल्या वडिलांना भेटली त्यावेळी संपूर्ण घटना समोर आली. गेल्या 4 दिवसांपासून या कैद्यावर उपचार सुरू असून जेलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आणि गृहमंत्र्यांनी याबाबत न्याय द्यावा अशी मागणी पवार यांच्या मुलीनं केली आहे. विशेष म्हणजे पवार याने जेलमध्ये शिक्षण घेऊन एलएलबीचं करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2014 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close