S M L

क्रिकेटचा ' किमयागार ' सचिनचा आज वाढदिवस

24 एप्रिल, मुंबई गेली 20 वर्षं क्रिकेटवर राज्य करणा-या मास्टर ब्लास्टर सचिनचा आज 36वा वाढदिवस आहे. सचिनचा वाढदिवस म्हणजे भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी राष्ट्रीय उत्सवच समजला जातो. टेस्ट असो किंवा वन डे क्रिकेट, बॅटिंगचे कित्येक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. सचिनने आतापर्यंत टेस्टमध्ये सर्वाधिक 42 सेंच्युरी आणि 12 हजार 773 रन्स केले आहेत तर वनडेत 43 सेंच्युरी आणि 16 हजार 684 रन्स केले आहेत. शिवाय सर्वात जास्त मॅच खेळण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. गेली दोन दशकं सचिनने क्रिकेटच्या मैदानावर रेकॉर्डब्रेक कामगिरी करून आजही त्याच्याकडून क्रिकेटप्रेमींच्या असलेल्या अपेक्षा कमी झालेल्या नाहीत. क्रिकेटचे बेताज बादशाह सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिन माझ्यासारखा खेळतो, अशी कौतुकाची थाप देऊन त्याच्या बॅटिंगच्या नैपुण्याला जगदमान्यता दिली. तर सचिनच्या कतृत्वाला भारतरत्न लतादीदी यांनी दिलेली दिलखुलास दाद त्याच्या महानतेचं दर्शन घडवते. वयाच्या 36व्या वर्षीही क्रिकेट जगतातल्या या ग्रेट खेळाडूचीरन्सची भूक थांबलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2009 11:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2009 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close