S M L

'बाबा' 'सुखरुप' परतले, कामाला लागले !

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2014 07:06 PM IST

'बाबा' 'सुखरुप' परतले, कामाला लागले !

11 जुलै : राज्याच्या नेतृत्वबदलाच्या चर्चांवर अखेर पडदा पडलाय. नेतृत्वबदलाच्या चर्चेला दिल्लीतूनच पूर्ण विराम मिळाल्यानंतर मरगळ आलेल्या काँग्रेसनेही आता विधानसभा निवडणुकींची जोरदार तयारी सुरू केलीय. गुरुवारी दिल्लीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी मुख्यमंत्री बदलले जाणार नाही आणि आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा हायकमांडकडून अभय मिळाल्यानंतर राज्यात परतल्यानंतर मुख्यमंत्री कामाला लागले आहे. अगोदरच मित्रपक्ष राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसने मरगळ झटकून रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.

विधानसभेसाठी ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तसंच 14 जुलैपर्यंत विभागीय समित्यांच्या बैठका पूर्ण करण्याचं नियोजन आखण्यात आलंय. त्यानंतर 17 जुलैपासून विभागीय मेळावे घेण्यात येणार आहे याचा पहिला मेळावा पुण्यात होणार आहे. विधानसभेसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचा काँग्रेसला प्रयत्न आहे.

काँग्रेसची निवडणूक रणनीती

  • - 14 जुलैपर्यंत विभागीय समित्यांच्या बैठका पूर्ण
  • - 17 जुलैपासून विभागीय मेळावे
  • - पहिला मेळावा पुण्यात होणार
  • - ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार जबाबदारी
  • - 30 जुलैपर्यंत जिल्हास्तरीय मेळावे होणार
  • - बूथ प्रभारींच प्रशिक्षण होणार
  • - पहिला प्रशिक्षण मेळावा बुलडाण्याला
  • - पक्ष संघटनेच्या बैठका मेळाव्यांची क्रांती दिनी सांगता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2014 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close