S M L

राजना आगामी निवडणुकीत मोदी लाट कळेल -फडणवीस

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2014 08:36 PM IST

राजना आगामी निवडणुकीत मोदी लाट कळेल -फडणवीस

11 जुलै : ...असं असेल तर राज ठाकरे यांना येणार्‍या निवडणुकीत मोदींची लाट काय आहे ती नक्की कळेल असं सणसणीत प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलंय.

तसंच लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा सर्वांना माहित आहे. मोदी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा भाजपला 200 जागा मिळतील असा अंदाज बांधत होते पण निकाल काय लागला हे जगजाहीर आहे. त्यांनी जनतेमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केलाय त्यामुळे मोदी लाट ओसरण्याचा प्रश्नच नाही असंही फडणवीस यांनी बजावून सांगितलं.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मोदी प्रेम सर्वश्रूत आहे. अनेक सभांमधून राज यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. एव्हाना लोकसभा निवडणुकीत तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊन लोकसभा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं पण त्यात जनतेनं मनसेलाच 'औकात' दाखवत चांगलंच तोंडावर पाडलं. पण आज अचानक राज यांनी युटर्न घेत मोदींवर तोफ डागली. नरेंद्र मोदींची हवा आता विरली आहे. मोदींना डोक्यावर घेणारा सोशल मीडिया आज त्यांच्याच विरोधात लिहितोय अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

मोदींच्या बाबतीत सोशल मीडियाचा अंदाज घेऊन राज यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका, असा सल्लाही आपल्या युवा कार्यकर्त्यांना दिला. मात्र राज यांच्या टीकेवरुन भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत येणार्‍या निवडणुकीत मोदींची लाट काय आहे ते पाहाच असा खणखणीत टोला लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2014 08:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close