S M L

यशस्वी लोकांवर टीका होणं स्वाभाविकच -गडकरी

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2014 01:18 PM IST

raj and gadkari12 जुलै : नरेंद्र मोदींची हवा विरली अशी टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवलीय. यशस्वी लोकांवर टीका होणं स्वाभाविक आहे असं प्रत्युत्तर रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय.

मुंबईत झालेल्या मनसेच्या युवा मेळाव्यात राज यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली. मोदींची हवा आता विरली आहे. मोदींना डोक्यावर घेणारा सोशल मीडिया आज त्यांच्याच विरोधात लिहितोय, असं राज ठाकरे म्हणाले होते.

राज यांच्या टीकेमुळे भाजपच्या नेत्यांनी राज यांच्या हल्लाबोल केला. मोदींची ताकद काय आहे विधानसभा निवडणुकीत राज यांना पाहायला मिळेलच असं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

त्यानंतर आता नितीन गडकरी यांनीही राज यांचा समाचार घेतला. विशेष म्हणजे भाजपमध्ये आणण्यासाठी नितीन गडकरींनी पुढाकार घेतला होता. पण मोदींवर केलेल्या टीकेमुळे गडकरींनी नाराजी व्यक्त करत यशस्वी लोकांवर टीका होणं स्वाभाविकच आहे असं म्हटलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही यात उडी घेतलीय. कालपर्यंत स्वप्नात असलेले राज ठाकरे आज जागे झाले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2014 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close