S M L

शिवसेनेत परतण्याची बातमी कपोलकल्पित-भुजबळ

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2014 04:37 PM IST

BHUJBAL ON MUNDE312 जुलै : आपण शिवसेनेत जाण्याची बातमी कपोलकल्पित असून ज्या वृत्तपत्रात ही बातमी आली आहे. त्यात आपला सविस्तर खुलासा असल्याचं सांगत शिवसेनेत जाण्याचा बातमीचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी खंडन केलंय. गोंदियात नवीन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

छगन भुजबळ शिवसेनेत परतणार अशी बातमी एका मराठी वृत्तपत्राने दिली होती. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याचं चित्र पाहता भुजबळांनी अगोदर भाजपची वाट धरली. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याला विरोध केला. त्यामुळे भुजबळांनी पूर्वश्रमीत सेनेकडे मोर्चा वळवला असा दावा या बातमीत करण्यात आला.

तसंच आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराज यांनी मध्यस्थी केली असून उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकला असंही म्हटलंय. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचा दावाही करण्यात आला.

 आपली सेनेच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे ही बाब खोटी आहे. आपण राष्ट्रवादी सोडणार नाही असा भुजबळांचा खुलासाही या बातमी करण्यात आलाय. आता खुद्ध भुजबळांनी या वृत्ताचे खंडन केलंय. आपण शिवसेनेत जाण्याची बातमी कपोलकल्पित असून ज्या वृत्तपत्रात ही बातमी आली आहे. त्यात माझा खुलासाही छापण्यात आलाय असं भुजबळांनी स्पष्ट केलं. भुजबळांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या बातमीवर पडदा पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2014 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close