S M L

हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला जम्मू-काश्मिरमध्ये अटक

25 एप्रिल, श्रीनगरहिजबुल मुजाहिद्दीनच्या एका अतिरेक्याला भारतीय लष्करानं जम्मू-काश्मिरमध्ये आज अटक केली. त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा भारतीय लष्करानं जप्त केला आहे. त्याच्याकडूनच 120 अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती कळली आहे. भारतीय लष्करानं पकडलेल्या अतिरेक्याचं नाव मोईनुद्दीन उल-हक असून तो हिजबुल मुजाहिद्दीनचा जहाल अतिरेकी म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्याला जम्मू काश्मिरच्या गुरेजच्या जंगलातून अटक करण्यात आलीये. त्याच्याकडून दहा एके-56 रायफल्स, 1300 राऊंड काडतूस, 445 ग्रेनेड आणि डिटोनेटर्स तसंच 32 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. मोईनुद्दीन उल-हक याला पकडल्यामुळे भारतात घुसून घातपाती कारवाया करण्याचा मोठा कट हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. मोईनुद्दीनला इतर दहशतवाद्याप्रमाणे मनसरच्या जंगलात प्रशिक्षण मिळालं आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास 31 दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसखोरी केल्याचं भारतीय लष्कराचं म्हणणं आहे. यापैकी बरेच दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनाशी संबधीत आहेत. वर्षभरात सीमेवर घुसखोरी करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. यात 32 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचं भारतीय लष्करानं पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2009 12:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2009 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close