S M L

विनोद कांबळीने थकवलं बँकेचं कर्ज

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2014 09:47 PM IST

विनोद कांबळीने थकवलं बँकेचं कर्ज

12 जुलै : या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असणारा क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनं आता एका बँकेचं कर्ज थकवलं आहे. कांबळीने डोंबिवली नागरी सहकारी बँकेचं कर्ज थकवल्यानं त्याला बँकेनं नोटीस बजावली आहे. विनोद कांबळी आणि त्याची पत्नी आंदि्रया यांनी 2009 आणि 2010 साली बँकेकडून घर आणि कारसाठी कर्ज घेतले होतं.

मात्र त्यांनी कर्जाची कसलीच परतफेड न केल्यााने त्यांना बँकेनं नोटीस बजावली आहे. एवढंच नव्हे तर 2010 साली बँकेचे कर्मचारी विनोद कांबळीच्या घरी कर्जवसुलीसाठी गेले त्यावेळी पत्नी आंदि्रयानं बँकेच्या महिला कर्मचार्‍यास मारहाण केली होती. डोंबिवली नागरी सहकारी बँकेनं त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2014 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close