S M L

तुम्हाला अपात्र का ठरवू नये, अयोगाचा चव्हाणांना सवाल

Samruddha Bhambure | Updated On: Jul 14, 2014 09:33 AM IST

तुम्हाला अपात्र का ठरवू नये, अयोगाचा चव्हाणांना सवाल

13   जुलै :   पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर ठपका ठेवला आहे. निवडणुकीत दाखवलेला खर्च अयोग्य असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. त्याचबरोबर याप्रकरणी तुम्हाला अपात्र का घोषित करु नये अशी विचारणाही केली आहे.  या प्रकरणी निवडणूक आयोगाने अशोक चव्हाणांकडून 20 दिवसांमध्ये उत्तर मागितलं आहे. निवडणूक आयोगासमोर आलेल्या काही बातम्या या नक्कीच साध्या बातम्या नाहीत असंही आयोगाने म्हटलं आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज दिली ती जाहिरात आहे की बातमी ? जाहिरात आणि पेड न्यूज असेल तर मग निवडणूक खर्चात तसा उल्लेख का नाही ? उल्लेख केला नसेल तर त्याचं कारण काय ? आणि उल्लेख केला नसेल तर ते मग निवडणूक खर्च मर्यादेचं उल्लंघन नाही का? असा सवाल आयोगाने उपस्थित केला आहे. तसचं जर हे खरं असेल की ती पेड न्यूज किंवा जाहीरात होती पण त्याचा उल्लेख नाहीये तर मग तुमची खासदारकी का रद्द होऊ नये? असा सवाल ही आयोगाने उपस्थित केला आहे. आता येत्या 20 दिवसात चव्हाण काय उत्तर देतात यावर पुढची कारवाई अवलंबून आहे.

काय आहे हे पेड न्यूजचं प्रकरणं?

- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर 2009च्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज दिल्याचे आरोप

- महाराष्ट्रातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये अशोकपर्व नावाची पुरवणी छापण्यात आली

- ही बातम्यांची पुरवणी असल्याचा अशोक चव्हाणांचा दावा

- ही छुपी जाहिरात असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा

- निवडणूक आयोगाकडून प्रकरणाची सुनावणी सुरू

- पण आयोगाला सुनावणीचा अधिकार नाही, असा अशोक चव्हाणांचा युक्तिवाद

- निवडणूक आयोगाच्या अधिकाराला आधी हायकोर्टात, मग सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं

- निवडणूक आयोगाला या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार - सुप्रीम कोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2014 07:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close