S M L

शिवसेनाप्रमुखांना त्रास दिलेल्यांना शिवसैनिक स्वीकारणार नाहीत- उद्धव

Samruddha Bhambure | Updated On: Jul 14, 2014 01:51 PM IST

Uddhav-650

14    जुलै :  शिवसेनेत सर्व चांगले लोक अपेक्षित आहेत. भुजबळांबाबत माझ्याकडे अशी कोणती बातमी आलेली नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर ज्यांनी ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना त्रास दिला त्यांना शिवसैनिक स्वीकारणार नाहीत असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं.

राज्यात सध्या बंडखोरीचे वारे वाहू लागले आहे. काल राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना प्रवेशाची घोषणा केली आहे. आज छगन भुजबळ यांचे खास निकटवर्तीय आणि समता परिषदेचे विदर्भ प्रमुख किशोर कन्हेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यापूर्वी आज सकाळी त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

कन्हेरे नागपूर जिल्ह्यातल्या काटोल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भुजबळ शिवसेनेत असल्यापासून कन्हेरे त्यांच्या सोबत आहेत. कन्हेरे शिवसेनेत जात असल्यामुळे भुजबळ आधी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत पाठवून चाचपणी करत आहेत काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

कोण आहेत किशोर कन्हेरे ?

  • छगन भुजबळ यांच्यासोबत शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख
  • नागपुरात सुरुवातीला शिवसेनेचं काम केलं
  • भुजबळ काँग्रेसमध्ये गेले तेव्हा त्यांच्या सोबत कन्हेरेही काँग्रेसमध्ये
  • राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर भुजबळांबरोबर कन्हेरेही राष्ट्रवादीत
  • भुजबळांच्या समता परिषदेचे कन्हेरे विदर्भ अध्यक्ष
  • कन्हेरेंच्या अंकित कंस्ट्रक्शन या कंपनीला भुजबळांनी कामे दिल्याचा झाला होता आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2014 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close