S M L

'हम लोग जिहाद के लिये निकल चुके है'

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2014 12:14 AM IST

'हम लोग जिहाद के लिये निकल चुके है'

14 जुलै : "हम लोग जिहाद के लिये निकल चुके है, अब हमारी मुलाकत जन्नत में होगी" असं सांगून चार भारतीय तरुण जिहादसाठी इराकच्या नरकुंडात उडी घेतली असल्याची धक्कादायक घटना उजेडात आलीय. हे सर्व तरुण कल्याण येथील रहिवासी आहे. आरिफ एजाज मजीद, सईद फारुक तानकी, फहद, तन्वीर मकबूल आणि अमन नईम तांडेल अशी या चौघांची नाव आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत इन्कार केला.

कल्याणमध्ये बेपत्ता झालेले चार तरुण मे महिन्यात हे चार विद्यार्थी बेपत्ता झाले होते. कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात मे महिन्याच्या 25, 26, आणि 27 तारखेला या चौघांची बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी नोंदवली होती. आरिफ एजाज मजीद, सईद फारुक तानकी, फहद, तन्वीर मकबूल आणि अमन नईम तांडेल अशी या चौघांची नाव आहे. हे चौघे इराकमध्ये सुरू असलेल्या साम्प्रदाईक युद्धात सहभागी होण्यासाठी गेले. या चार तरुणातील तिघे जण हे इंजियनियरिंगचे विद्यार्थी असून एक बारावीचा विद्यार्थी आहे. हे सर्व बाजारपेठ परिसरातील रहिवासी असून सर्व सुस्थितीत असणार्‍या परिवारातील आहे.

इराक-ओमान-सिरीया वंशवादी युद्धात सहभाही होण्यासाठी आम्ही जात असून, त्याप्रकारचे पत्र आरिफ एजाज मजीद याने आपल्या कुटुंबाला जाण्यापूर्वी लिहिले असल्याचं कळतंय. या पत्रात "हम लोग जिहाद के लिये निकल चुके है, आप हमे खोजने की कोशिश मत करना, अब अपनी मुलाखत जन्नत मे होगी" असा आशयाचा मजकूर पत्रात लिहलेला आहे. मात्र असे कोणतेही पत्र मिळालं नसल्याचं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलंय. मात्र पोलीस याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत, आमच्याकडे फक्त या प्रकरणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे व त्याचा तपास सुरू आहे असं अप्पर पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2014 11:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close