S M L

युतीत रस्सीखेच, सेनेच्या 'बेस्ट' 15 जागा हव्या भाजपला !

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2014 05:38 PM IST

युतीत रस्सीखेच, सेनेच्या 'बेस्ट' 15 जागा हव्या भाजपला !

fadanvis_udhav_thackarey15 जुलै : विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे पण भाजप आणि शिवसेनेत आताच जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू झालीय.भाजप शिवसेना जागावाटपाची बोलणी अजूनही सुरू होऊ शकलेली नाहीत.

शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या किमान 15 जागा भाजपला हव्या आहेत, त्या जागांवर भाजपनं आपली दावेदारी सांगितली आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या बोलण्यांमध्ये या जागांचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहे.

जर भाजपला राज्यात हातपाय पसरायचे असतील तर ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुणे या ठिकाणी भाजपला जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागतील.

पण ठाणे, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड या ठिकाणी सर्वाधिक जागा शिवसेनेकडे आहेत. यातील काही जागा मिळाव्यात अशी भाजप नेत्यांची मागणी आहे.

या जागांसाठी भाजप आग्रही ?

 • - शहादा
 • - धुळे शहर
 • - भुसावळ
 • - कल्याण
 • - काळवण
 • - श्रीरामपूर
 • - तिवसा/अचलपूर
 • - जालना
 • - गंगापूर
 • - पालघर/डहाणू
 • - भिवंडी
 • - विलेपार्ले
 • - मुंबादेवी
 • - कोथरुड
 • - माढा किंवा दक्षिण सोलापूर
 • - तासगाव
 • - गुहागर
 • - तलासरी
 • - भिवंडी
 • - विलेपार्ले
 • - मुंबादेवी
 • - पालघर/डहाणू

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2014 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close