S M L

'हाफीज सईदला भेटणं हा देशद्रोहच'

Samruddha Bhambure | Updated On: Jul 16, 2014 03:33 PM IST

'हाफीज सईदला भेटणं हा देशद्रोहच'

16  जुलै : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफीज सईदची भेट घेणारे बाबा रामदेव यांचे सहकारी आणि पत्रकार वेद प्रताप वैदिक हे देशद्रोहीच आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैदिक-सईद भेटीवर तोफ डागली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणावर फक्त खुलासा करणं पुरेसं नसून, कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रपक्षाला घरचा अहेर दिला आहे.

योगगुरू रामदेव बाबांचा सहकारी आणि पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी नुकताच पाकिस्तान दौरा केला होता. या दौर्‍यात वैदिक यांनी 26-11चा मास्टरमाईंड हाफीज सईदची भेट घेतली होती. वैदिकना ही भेट घेण्यासाठी सरकारी परवानगी नव्हती असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, पण काँग्रेसने या प्रकरणात विस्तृत उत्तरांची मागणी केली आहे. एकीकडे विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी केली असतानाच बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दै.सामनामधून या भेटीवर जोरदार टीका केली आहे.

'हाफीझ सईद हा नुसता दहशतवादीच नाही तर भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा तोच खरा मास्टरमाईंड आहे. शेवटी प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा आहे. आज जर केंद्रात काँग्रेसचं राज्य असतं आणि त्या राजवटीत जर एखादा अवसानघातकी पत्रकार दाऊद इब्राहिम किंवा हाफीज सईदला भेटला असता तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सरकारला जाब विचारणारीच भूमिका घेतली असती हे मान्य करावे लागेल. या भेटीशी सरकारचा संबंध नाही एवढाच खुलासा पुरेसा नाही. भारताविरुद्ध भयंकर कारस्थान रचणार्‍या हाफिजला अशाप्रकारे भेटणे हा देशद्रोहच आहे, त्याविरुद्ध सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत. कें द्र सरकारने कारवाई केली नाही तर उद्या कोणीही जाऊन दाऊद, टायगर मेमन यांच्यासोबत बिर्याणी खाऊन येईल', असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2014 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close