S M L

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत?

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2014 02:07 PM IST

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत?

17   जुलै :  मुंबईत 26/11 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांच्याबाबतची सूचना थांबविण्यासह त्यांच्या पत्नी विनिता कामटे यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत.

चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर रत्नाकर गायकवाड यांनी नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारला चौकशी आयोग कायद्यान्वये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यास सांगितले होते. ही समिती कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांना राकेश मारिया यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली होती की नाही, याचा तपास करणार होती. 9 जुलै रोजी रत्नाकर गायकवाड यांनी तीन पानी आदेश जारी केला असून; त्या आदेशात या प्रकरणी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, 26/11 हल्ल्याच्या दिवशी कंट्रोल रूम आणि शहीद अशोक कामटेंच्या व्हॅनदरम्यान झालेल्या फोनकॉल्सची माहिती विनिता कामटे यांनी माहिती अधिकाराद्वारे मागवली होती सुरुवातीला ही माहिती पुरवण्यास नकार दिल्याचा विनिता कामटेंचा आरोप आहे आणि नोव्हेंबर 2009 आणि फेब्रुवारी 2010 मध्ये जेव्हा ही माहिती पुरवली गेली तेव्हा त्यात प्रचंड विसंगती असल्याचं विनिता कामटे यांचं म्हणणं आहे. अशोक कामटे यांना कामा हॉस्पिटलकडे पाठवण्याचे आदेश कोणी दिले, हे सांगण्यासही मारियांनी नकार दिल्याचा विनिता कामटेंचा आरोप आहे. राकेश मारिया 26/11 हल्ल्यावेळी चालू असलेल्या 59 तासांच्या मोहिमेदरम्यान कंट्रोल रूमचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. मारिया यांनी विनिता कामटेंपासून माहिती दडवणं हे प्रचंड बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. मारिया काही लपवू इच्छित होते का असा संशय येतो, असे ताशेरे मुख्य माहिती आयुक्तांनी ओढले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close