S M L

घोलप आणि हळवणकरांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Jul 17, 2014 03:32 PM IST

 घोलप आणि हळवणकरांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

17   जुलै :  शिवसेनेचे नाशिकमधील देवळाली या मतदारसंघाचे आमदार बबन घोलप आणि भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बबन घोलप यांना तर वीजचोरी प्रकरणी सुरेश हळवणकर यांना कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. पूर्ण चौकशी अंती राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवून या दोघांची आमदारकी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे या दोघांच्या आमदारकीची पदं रिकामी होतील, असा अभिप्राय वळसे पाटील यांच्याकडून पाठवला जाणार आहे. लोक प्रतिनिधी कायद्यानुसार या दोघांची आमदारकी तर रद्द होणारच आहे पण  पुढची आठ वर्षं कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. बबन घोलप शिवसेनेचे देवळालीचे आमदार आहेत.

युतीच्या काळात ते समाजकल्याण राज्यमंत्री होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 1999 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं त्यांना दोषी ठरवलं आहे. तर सुरेश हळवणकर भाजपचे इचलकरंजीचे आमदार आहेत. वीजचोरी प्रकरणी त्यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close