S M L

कल्याणच्या बेपत्ता तरुणांशी आमचा संबंध नाही, व्यापार्‍यांचा खुलासा

Samruddha Bhambure | Updated On: Jul 17, 2014 03:56 PM IST

 कल्याणच्या बेपत्ता तरुणांशी आमचा संबंध नाही, व्यापार्‍यांचा खुलासा

17   जुलै :  कल्याणच्या बेपत्ता तरुणांशी आमचा संबंध नाही, व्यापारी आदिल डोलारे आणि इस्लामिक गायडन्स सेंटरच्या मोहसीन खान यांचा खुलासा. बेपत्ता मुलं इराकमध्ये जिहादमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आदिल डोलारे यांनी त्या चौघांचा ब्रेनवॉश केला आणि इस्लामिक गायडन्स सेंटर या संस्थेनं या तरुणांचा खर्च उचलला असा आरोप करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये दोन महिन्यांपूर्वी आम्ही व्यापाराच्या निमित्तानं गेलो होतो, आमच्या विरोधात खोटे आरोप लावून बदनाम केले जातं आहे. याबाबत आम्ही आमच्या वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेत असून, आमची नाहक बदनामी करणार्‍या विरोधात कारवाई करणार आहोत, असं मोहसीन खान आणि व्यापारी आदिल डोलारे यांनी स्पष्ट केले आहे तर इस्लामिक गायडन्स सेंटर ही एक सामाजिक संघटना असून पुस्तकांचे वाचनालय चालवले जाते आणि व्यसनाधीनतेच्या विरोधात आणि स्त्रीभ्रूण हत्या अशा सामाजिक विषयांवर समाजात जागृतीचे काम ही संस्था करते, तसेच गोरगरीब परिवारांना दरमहा रेशन देखील ही संस्था देते असे या संस्थेचे प्रमुख मोहसीन खान यांनी सांगितले आहे.

दरम्यान, इराकमध्ये अडकलेले उरलेले भारतीय परतायला सुरुवात झालीये. हे भारतीय आज पहाटे नवी दिल्लीला पोहोचले. इराकमधल्या युद्धग्रस्त परिस्थितीत अनेक भारतीय अडकले होते. त्यापेकी अनेकांनी आपल्याला इराकमध्ये नोकरी देणार्‍या कंपन्यांनी आपली योग्य काळजी घेतली नाही असा आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close