S M L

बालगोविंदांवर बंदी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 17, 2014 04:34 PM IST

बालगोविंदांवर बंदी

govinda17 जुलै : यंदा गोविंदा पथकांच्या उत्साहावर 'पाणी' पडलंय. 12 वर्षांखालच्या मुलांना दहीहंडीमध्ये वरच्या थरांवर चढविण्यावर 'महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा'ने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीच्या अंमलबजावणीबाबत कायदा यंत्रणांना योग्य ती दखल घेण्याचंही आदेश आयोगाने दिलेले आहेत. याचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचे करण्याचे आदेश बालहक्क संरक्षण आयोगाने दिले आहेत.

दहीहंडीला आता स्पर्धा आणि ग्लॅमर्स लूक आलं आहे. जे पथक सगळ्यात जास्त मजल्याचं थर लावतील त्यांना हजारो-लाखो रुपयांची बक्षीसं मिळतात. पण सगळ्यात वरच्या थरावरून दहीहंडी फोडण्यासाठी बालगोविंदांचा सहभाग दहीहंडीमध्ये केला जातो.

मात्र अनेक वेळा गोविंदा मंडळांनी लावलेले मनोरे कोसळतात. यामध्ये बरेच बालगोविंदा जखमीही होत असतात. त्यामुळे 12 वर्षांखालील मुलांना दहीहंडी थरांवर चढण्यास आता बंदी घालण्यात आलीय. दहीहंडीतले वाढते अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदीच्या अंमलबजावणीबाबत कायदा यंत्रणांना योग्य ती दखल घेण्याचेही आदेश आयोगाने दिलेले आहेत. याचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश बालहक्क संरक्षण आयोगाने दिले आहेत. येत्या 18 ऑगस्ट रोजी दहीहंडी सोहळा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close