S M L

राष्ट्रवादीला धक्का, भुजबळांचे आणखी एक समर्थक शिवसेनेत

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2014 07:45 PM IST

राष्ट्रवादीला धक्का, भुजबळांचे आणखी एक समर्थक शिवसेनेत

17 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं राष्ट्रवादीला आणखी एक धक्का दिलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे कायदेशीर सल्लागार मंगेश बनसोड यांनी आज (गुरुवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांच्यासोबत सिन्नरचे राजाभाऊ वझे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. किशोर कान्हेरेनंतर मंगेश बनसोड हे भुजबळांचे दुसरे जवळचे सहकारी शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

त्यामुळे भुजबळांची पर्यायानं राष्ट्रवादीची ताकद कमी झालीय. दोनच दिवसांपूर्वी भुजबळांचे खंदे समर्थक किशोर कान्हेरेंनी शिवसेनेत प्रवेश केला. या अगोदर खुद्ध भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती मात्र उद्धव यांनी बाळासाहेबांना त्रास देणार्‍यांना सेनेत प्रवेश नाही असं सांगून दार बंद करुन टाकलंय. पण दुसरीकडे भुजबळांचेच समर्थक सेनेत प्रवेश करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 07:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close