S M L

अग्नितांडव थांबलं, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2014 10:31 PM IST

अग्नितांडव थांबलं, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

lotus18 जुलै : मुंबईतील अंधेरी लिंक रोडवर लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेली आग आटोक्यात आली. पण दुपारी या आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. या आगीत अग्निशमन दलाचे जवान नितीन येवलेकर यांचा मृत्यू झालाय. येवलेकर हे बोरिवली अग्निशमन दलाचे जवान होते. आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असताना धुरामुळे जीव गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर या आगीत आणखी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहे. तर 6 जणांची सुटका करण्यात यश आलंय.

बचावकार्यासाठी वायुसेनेच्या जवानांची मदत घेण्यात आली. अडकलेल्या अधिकार्‍यांना बाहेर काढण्यासाठी नेव्हीचं चेतक हेलिकॉप्टर दाखल झालंय. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास लोटस पार्कच्या 21 व्या मजल्यावर आग लागली. मात्र या आगीचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.

पण 21 व्या मजल्यावर आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तिथं पर्यंत पोहचण्यात अडथळा येत आहे. 21 व्या मजल्याला लागलेली आग इमारतीत पसरली. या आगीत 21 वा,22 वा मजला जळून खाक झालाय. घटनास्थळी फायरब्रिगेडच्या 18 ते 20 गाड्या दाखल आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांसोबत वायुसेनेचे जवानही मदतकार्यासाठी पोहचले आहे. या बिल्डिंगमध्ये अभिनेता ह्रतिक रोशन, दिग्दर्शक प्रकाश झा, बालाजी टेलिफिल्म्स, महुआ चॅनल, अजय देवगन यांचे ऑफिसेस असल्याचं सांगितलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close