S M L

'मिशन महाराष्ट्र', अमित शाह सरसंघचालकांच्या भेटीला

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2014 02:14 PM IST

'मिशन महाराष्ट्र', अमित शाह सरसंघचालकांच्या भेटीला

18 जुलै : भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शाह नागपूर दौर्‍यावर आहे. आज सकाळी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. दुपारी चार वाजता आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत शाह भेट घेणार आहेत. यावेळी मोहन भागवत आणि सहकार्यवाह भैय्याजी जोशी उपस्थित असतील.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करायची किंवा नाही यासंदर्भातही भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी संरसंघचालक चर्चा करणार आहेत. वेगळ्या विदर्भाबाबत भाजपचे विदर्भाचे नेत आग्रही आहेत पण शिवसेनेचा विरोध आहे.

विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातही या भेटीत संघनेत्यांशी चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शाह यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात शहरात स्वागत केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close