S M L

आज उद्धव ठाकरेंचं वस्त्रहरण करणार, राणेंचा इशारा

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2014 10:14 PM IST

Image naryan_rane__udhav_thakare_300x255.jpg18 जुलै : काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावून आपल्या गावी परतल्यानंतर नारायण राणे यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव उगीच माझ्याविषयी बोलतात. आज संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे, त्यावेळी त्यांचं वस्त्रहरण करणार असा इशाराच राणे यांनी दिलाय.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी काँग्रेसविषयी नाराजीही व्यक्त केलीय. काँग्रेसने पक्षात घेताना जे कबूल केलं होतं ते काहीच दिलं नाही. माझ्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदं दिली नाहीत अशी नाराजी व्यक्त करत सोमवारी राजीनामा देणार असल्याचं त्यांनी पुन्हा एका सांगितलंय.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं हे सांगायलाही राणे विसरले नाही. काल गुरुवारी राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज राणे कोकणात दाखल झाले. राणे यांनी आजपासून 3 दिवसांचा कोकण दौरा सुरू केलाय. राणेंसोबत साधारण शंभर एक कार्यकर्ते आहेत. राणे यांनी चेंबूर, पनवेल, महाड, हातखांबे असा दौरा करत कणकवलीत दाखल झालेत. संध्याकाळी 5 वाजता रत्नागिरीत राणे पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथं ते काय बोलताहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close