S M L

हवाई हल्ले आणि तोफांचा मारा न करण्याचे श्रीलंकन सरकारचे लष्कराला आदेश

27 एप्रिल, कोलंबोलिट्टेविरोधातल्या कारवाईत जोरदार हवाई हल्ले आणि तोफांचा भडीमार करू नये अशा सूचना श्रीलंका सरकारनं लष्कराला दिल्या आहेत. लिट्टेच्या ताब्यात असलेल्या तामिळी लोकांना इजा होऊ नये यासाठी हे आदेश देण्यात आल्याचं सरकारने म्हटलंय. प्रभाकरन आणि त्याच्या साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तर एकीकडे श्रीलंका सरकारनं युद्ध जिंकल्याचा विश्वास व्यक्त केलाय.सोमवारी श्रीलंकन लष्कराने लिट्टेच्या ताब्यात उरलेल्या 6 किलोमीटरच्या प्रदेशात प्रवेश केला. पण या वॉर झोनमध्ये अडकलेल्या सुमारे 50 हजारहून जास्त तामीळ नागरिकांपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत आणि जीवनावश्यक वस्तू पोहचलेल्या नाहीत. वॉर झोनमधल्या 20 हजारहून अधिक तरुणांना लिट्टेनं आपल्या गोटात जबरदस्तीनं दाखल करून घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इथल्या 2 लाखांहून अधिक नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये हलवण्यात आल्याचं लष्करानं सांगितलंय. मात्र आंतरराष्ट्रीय संघटनांना या ठिकाणी येण्याची मनाई करण्यात आलीय. त्यामुळे लष्कराची सांगितलेल्या आकडेवारीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून शंका व्यक्त केली जातेय. संयुक्त राष्ट्र संघाच्या मदत कार्याचे प्रमुख जॉन होम्स यांनी अध्यक्ष महिंद्रा राजपाक्षे यांच्याशी यासंदर्भात फोनवरून चर्चा केली. पण यावर श्रीलंकन लष्करानं कोणतंही उत्तर दिलेलं नाही.वॉर झोनच्या प्रदेशातील अन्न आणि पाण्याचा साठा जवळजवळ संपत आल्याची माहिती आहे. आपल्या ताब्यातील प्रदेशातल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलीय, असा दावा लिट्टेनं केलाय. शस्त्रसंधी झाली तर या नागरिकांना अन्न-पाणी आणि इतरही आवश्यक वस्तू मिळण्यास मदत होऊ शकते. लिट्टेला नेस्तनाबूत करण्याचा चंग श्रीलंकन सरकारनं बांधला आहे. दरम्यान, भारत सरकारनं श्रीलंकेतल्या तामिळींसाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2009 05:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2009 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close