S M L

अमित शहा आणि सरसंघचालकांची चर्चा

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2014 08:42 PM IST

अमित शहा आणि सरसंघचालकांची चर्चा

shah_rss_meet18 जुलै : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. नागपूरच्या महाल येथील मुख्यालयात दोन तास ही बैठक चालली.

त्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा विषय, पक्षसंघटना याबद्दल चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. बंद खोलीत झालेल्या या चर्चेत संघाचे सरसंघचालक आणि भैय्याजी जोशीही उपस्थित होते.

या भेटीआधी भाजपचे अमित शहा यांनी नागपूरच्या रेशिमबागमधल्या स्मृतीमंदिर येथील संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे उपस्थित होत्या. दुपारी शहा यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 08:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close