S M L

लोटस पार्क अग्नितांडव : आणखी एक मृतदेह सापडला

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2014 08:52 PM IST

1fire_lotus18 जुलै : मुंबई येथील अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्क बिल्डिंगला लागलेली आग आटोक्यात आली आहे. पण या आगीत अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झाला.  तर घटनास्थळी आणखी एक मृतदेह सापडला आहे. मात्र मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही.

अग्निशमन दलाचे जवान या आगीमध्ये अडकले होते. त्यांची हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आली. जखमींवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, पण त्याची प्रकृती अतिगंभीर आहे. आज (शुक्रवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली. फायर ब्रिगेडच्या 42 गाड्या आणि 25 ते 30 वॉटर टँकर्सच्या प्रयत्नांनी हा आग आटोक्यात आणली.

इमारतीमध्ये फायर सेफ्टी यंत्रणा नव्हती असं लक्षात आलंय. काचेच्या इमारतींच्या बांधकामाबाबत पुनर्विचार करणार असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितलंय. आगीतल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 15 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय. तसंच लोटस पार्कच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 08:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close