S M L

लोकसभेच्या पराभवाला मुख्यमंत्रीच जबाबदार -राणे

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2014 01:19 PM IST

लोकसभेच्या पराभवाला मुख्यमंत्रीच जबाबदार -राणे

123rane_on_cm19 जुलै : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार आहेत, असा थेट हल्ला उद्योगमंत्री नारायण राणेंनी चढवलाय. आयबीएन-लोकमतशी त्यांनी खास बातचीत केलीय.

राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असून त्याची कारणं सोमवारी जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही असंही राणेंनी सांगितलं.

राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नारायण राणे कोकणच्या दौर्‍यावर आहेत. नारायण राणेंनी आज (शनिवारी) सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठ तालुक्यांचा दौरा सुरू केला. त्यांनी पहिल्यांदा कणकवलीत पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

या बैठकीला त्यांचे राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली मात्र गैरहजर होते. त्यांनतर वैभववाडी, देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी इथंही राणे आपल्या पदाधिकारी आणि समर्थकांच्या बैठका घेणार आहेत. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतिश सावंत, माजी आमदार राजन तेली, संजय पडते, काका कुडाळकर अशा राणेसर्थक काँग्रेस नेत्यांनी राणेंच्या मुलांना जाहीर विरोध करायला सुरूवात केलीय. आता ही मंडळी राणेंच्या दौर्‍यात गैरहजर राहण्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close