S M L

राणेंचे खंदे समर्थक रवींद्र फाटक शिवसेनेत

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2014 02:18 PM IST

राणेंचे खंदे समर्थक रवींद्र फाटक शिवसेनेत

ravindra_fatak19 जुलै : एकीकडे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलीय. पुढील रणनीती आखण्यासाठी राणे कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवलाय पण दुसरीकडे राणेंचे खंदे समर्थक मानले जाणारे काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

6 नगरसेवकांसह त्यांनी आज (शनिवारी) सकाळी शिवसेनेत प्रवेश केला आहे. फाटक यांनी सकाळीच उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते. उद्धव यांच्याशी चर्चा केल्यानंतर एका छोटोखानी प्रवेश सोहळ्यात फाटक यांनी सहा नगरसेवकांसह सेनेत दाखल झाले.

विशेष म्हणजे राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांनीच बाळासाहेबांना छळलं पुन्हा माझ्या वाट्याला गेला तर पुन्हा वस्त्रहरण करेन अशी धमकीवजा इशारा दिला होता. आणि आज राणेंचे खंदे समर्थक सेनेत दाखल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close