S M L

राणेंच्या आत्म्याला कोणत्या तरी पक्षात शांती लाभो -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2014 06:30 PM IST

455udhav_thakare19 जुलै : नारायण राणेंना सात्वनांची गरज आहे आणि त्यांच्या मनाला कोणत्या तरी पक्षात शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. आज (शनिवारी) नारायण राणेंचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांनी सेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या एका छोटेखानी प्रवेश सोहळ्यात फाटक यांनी आपल्या सहा समर्थकांसह सेनेत दाखल झाले. यावेळी उद्धव यांना पत्रकारांशी संवाद साधला.

नारायण राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असं जाहीर करुन कोकणात परतल्यानंतर थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेबांना उद्धवनेच छळलं, त्यांचा सर्वाधिक त्रास उद्धवनेच दिला असा एकेरी उल्लेख करत राणेंनी घणाघाती आरोप केला होता. तसंच माझ्या वाट्याला पुन्हा गेला तर पुन्हा वस्त्रहरण करेन असा इशाराही राणे यांनी दिला. या अगोदर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना त्रास देणार्‍यांना शिवसेनेत जागा नाही आणि भाजपनेही युतीचा धर्म पाळून राणेंना प्रवेश देऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे संतापलेल्या राणेंनी थेट 'मातोश्री'वर घडलेल्या आतल्या गोष्टी बाहेर काढण्याची धमकीच दिली. यावर उद्धव यांनी समिश्र प्रतिक्रिया देत त्यांच्या आत्म्याला कोणत्या तरी पक्षात शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असा टोला लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close