S M L

माझ्या वाटेला लागू नको, राणेंचा उद्धवना इशारा

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2014 01:14 PM IST

माझ्या वाटेला लागू नको, राणेंचा उद्धवना इशारा

3rane vs udhav19 जुलै : उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागलीय. गेली दोन वर्ष शांत होतो आता मी, सुरू झालो आहे माझ्या वाटेला लागू नको असा धमकीवजा इशाराच राणेंनी उद्धव यांना पुन्हा दिला. तसंच एकही खासदार निवडणून आणण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पाहू नयेत. जे 18 खासदार निवडणून आले ते मोदींच्या कृपेने आले आहेत अशी जळजळीत टीकाही राणेंनी उद्धव यांच्यावर केलीय. कणकवलीतल्या सभेत ते बोलत होते.

मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा मुंबईत शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना पोलीस संरक्षण घ्यावं लागलं होतं. माझ्या सावलीला घाबरणारे काय कोकण भयमुक्त करणार ? कधी मातोश्रीतून वांद्र्याला गेलात का ? कधी बेहरमपाड्यात गेलात का ? मग कसला कोकण भयमुक्त करणार असा टोलाही राणेंनी लगावला. तसंच सेनेत घेणार नाही म्हणे, पण मला सेनेत जाण्याची गरजच नाही. महाराष्ट्रात कुठेही उभा राहुन निवडणूक लढवू शकतो असंही राणे म्हणाले.

तर दुसरीकडे राणे यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली होती. त्यावेळी राणे थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही बरसले. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोप राणेंनी केला. राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असून त्याची कारणं सोमवारी जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राणेंनी आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठ तालुक्यांचा दौरा सुरू केलाय. त्यांनी कणकवलीत सभा घेऊन राजीनामा देणार असल्याचा पुनरुच्चार केला. त्यापूर्वी त्यांनी कणकवलीत पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला त्यांचे राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली मात्र गैरहजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close