S M L

'विमान दुर्घटनेच्या घटनास्थळाची तपासणी करू दिली नाही'

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2014 07:49 PM IST

mh17_1019 जुलै : युक्रेनमध्ये पाडण्यात आलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या अवशेषांजवळ तपासासाठी जाऊ दिलं नाही असा दावा आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी केला आहे.

फक्त 75 मिनिटं या घटनास्थळी जाऊ देण्यात आलं त्यानंतर सशस्त्र बंडखोरांनी आपल्याला रोखलं, असा दावा या निरीक्षकांनी केलाय. पण आपण निरीक्षकांना या ठिकाणी जाऊ देण्यासाठी तयार असल्याचं युक्रेनियन फुटीरतावादी गटांनी म्हटलं आहे.

अमेरिका आपली संघटना एफबीआय आता या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी 2 अधिकारी पाठवणार आहे. या घटनेची स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं.

या हल्ल्यामागे युक्रेनमधील रशियानेच पाठबळ दिलेले फुटीरतावादी गट असल्याचंही ओबामांनी म्हटलंय. दरम्यान, विमानातील डेटा रेकॉर्डस सध्या युक्रेनमध्येच असले तरी ते नेमके कुठे आहेत हे समजू शकलं नसल्याचं युक्रेनियन अधिकार्‍याने म्हटलंय. आतापर्यंत ढिगार्‍यातून 180 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 07:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close