S M L

नितीन इवलेकरांना अखेरचा निरोप

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2014 09:48 PM IST

नितीन इवलेकरांना अखेरचा निरोप

19 जुलै : अंधेरीच्या लोटस बिझनेस पार्कच्या आगीत शहीद झालेले नितीन इवलेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आज (शनिवारी) विरार इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चार वर्षांच्या सोनवी आणि दीड वर्षांच्या सुहा या मुलींनी नितीन यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

त्यापूर्वी दुपारी नितीन इवलेकर यांचा पार्थिव त्यांच्या आईच्या घरी म्हणजेच मानखुर्द इथं नेण्यात आला होता. नितीन यांचं संपूर्ण बालपण याच परिसरात गेलं. त्यामुळे तिथे पार्थिव नेल्यानंतर उपस्थित असलेल्यांना अश्रू आवरले नाहीत. तर सकाळी इवलेकर कुटुंबीयांनी नितीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. नितीन यांचा मृत्यू अपुर्‍या सुरक्षा साधनांमुळे झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

नितीन यांच्या पत्नींना सरकारी नोकरी आणि कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही कुटुंबीयांनी केली होती. संध्याकाळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी के. एल. वर्मा यांनी इवलेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या आणि त्यांना लेखी पत्रही देण्यात आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी नितीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास तयारी दाखवली. रात्री साठेआठच्या सुमारास विरारमध्ये नितीन इवलेकरांना अखेरचा निरोप देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 09:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close