S M L

कोकणात राडा, राणेंची पोस्टर्स फाडली

Samruddha Bhambure | Updated On: Jul 20, 2014 03:38 PM IST

कोकणात राडा, राणेंची पोस्टर्स फाडली

Rane posters 1

20  जुलै :  नाराज काँग्रेस नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आज दुपारी कणकवलीत कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. त्याआधी आज पहाटे नारायण राणेंच्या मेळाव्याची वेंगुर्ल्यात लावलेली पोस्टर्स काही अज्ञात व्यक्तींनी फाडली.

गेल्या 3 दिवसांपासून नारायण राणे कोकणच्या दौर्‍यावर असून आज त्यांचा कणकवलीत मेळावा होणार आहे. त्यानिमित्त आज कणकवली आणि वेंगुर्ल्यातून राणेंचे कट्टर सर्मथक या मेळ्याव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पण त्याआधी हे पोस्टर प्रकरण घडल्याने आज राणेच्या मेळाव्यात पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार आहेत. पोस्टर्स फाडणार्‍यांना पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप राणेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही आता यात लक्ष घातलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत बोलावून घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2014 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close