S M L

कसाब अल्पवयीन नाही : कोर्टापुढे अहवाल सादर

27 एप्रिलकसाब अल्पवयीन नसल्याचा अहवालस्पेशल कोर्टापुढे सादर करण्यात आला आहे. या अहवाल वाचनानंतर कसाब अल्पवयीन नसल्याची सुनावणी करण्यात आली आहे. मुंबईवरील 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कसाब अल्पवयीन असल्याचा दावा त्यांचे वकील अब्बाज काझमी यांनी केला होता. याबाबत कसाबची वैद्यकीय चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. या वैद्यकीय चाचण्या आणि जेलमधील साक्षीपुराव्यांच्या आधारे कसाबचं वय वीस वर्षापेक्षा जास्त असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. मुंबईवरील 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कसाबला दाया हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्याने त्याचं वय 21 वर्षं असल्याचं सांगितलं होतं असा पुरावा डॉक्टर राममूर्ती यांनी आज कोर्टात साक्ष देताना सादर केला. तर मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याचा एकमेव जीवंत आरोपी अजमल कसाबची पोलिस कस्टडीतून आर्थर रोड जेलमधे रवानगी करण्यात आली त्यावेळीही त्याने आपलं वय 21 वर्षं असल्याचं सांगितलं होतं असा अजून एक पुरावा आर्थर रोड जेल सुप्रिटेण्डण्ट स्वाती साठे यांनी आज कोर्टापुढे साक्षीदाखल सादर केला. या दोघांच्या साक्षीवरून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाब अल्पवयीन नसल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. कसाब अल्पवयीन नसल्याचं जाहीर केल्यावर कसाबचे वकील अब्बाज काझमी यांची प्रतिक्रिया विचारली असता ' मी कसाबला वाचवायचा प्रयत्न करत नसून तो अल्पवयीन असल्याचं सिद्‌ध करताना त्याचा खटला बाल गुन्हेगार न्यायालयात चालवण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यामुळे कसाबला फक्त तीनंच वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. माझ्याजवळ सध्या तरी कसाबचं अचूक वय सांगण्यासाठी त्याचं बर्थ सर्टिफिकेट आणि स्कूल लिविंग सर्टिफिकेट नाही. तरीही उद्या कोर्टात कसाब अल्पवयीन आहे हे सिद्ध करण्यासाठी दोन महत्त्वाच्या साक्ष सादर करण्यात येतील अशी माहिती पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली. असं असलं तरीही आज कोर्टात कसाब अल्पवयीन नसल्याची दोघांची जमेची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या केवळ हा खटला मुंबई कोर्टातून बाल गुन्हेगार न्यायालयात हलवण्यासाठी कसाबचे वकील अब्बाज काझमी निश्चितच प्रयत्न करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2009 06:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2009 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close