S M L

149 वॉर्डमध्ये नेते आणि चिन्हाबद्दलचा संभ्रम कायम

28 एप्रिल,गोविंद तुपेमतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष सध्या आटापिटा करताहेत. पण या निवडणुकीत मतदारांमध्ये अजूनही एक संभ्रम आहे. मतदार संघाच्या फेररचनेमुळे तो निर्माण झालाय. 149 वॉर्ड 3 मतदार संघात विभागल्यामुळे नेते आणि चिन्हाबद्दलचा संभ्रम लोकांच्या मनात आजूनही कायम आहे. मुंबईतल्या 149 वॉर्डमध्ये मध्यभागी असणार्‍या अमर महलच्या ब्रीजच्या पाठीमागील उंच इमारती छेडानगरमधील आहेत आणि छेडा नगर हा भाग दक्षिण मध्य मुंबईत तर त्याच्या पाठीमागील जय आंबेनगर हा भाग ईशान्य मुंबईत येतो. तर त्याच्या उजव्या हाताला असलेल्या झोपड्या म्हणजे पेस्तम सागर टिळक नगरचा भाग हा उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात येतो.मुंबईतल्या चेंबूर इथल्या पेस्तम सागर भागामधेही तीच गत. प्रभाकर पाकतेकर इथे राहतात. पूर्वी त्यांचा मतदार संघ ईशान्य मुंबई होता. तर आता उत्तर मध्य मुंबई आहे. पण त्यांना तुमच्या विभागातून कोण निवडणूक लढवतंय असं विचारलं असता आपण कुठल्या मतदार संघात आहोत हे समजायला कठीण गेलं. किंबहुना राजकीय नेत्यांनाही हे समजायलाही वेळ लागला. याबद्दल नगरसेवक राजाभाऊ चौगुले यांना विचारलं असता 'एवढी वर्षं माझे तिन्ही विभाग ईशान्य मुंबईत होते त्यामुळे लोकांचा एक पगडा बसला आहे', असं त्यांनी सांगितलं.युतीच्या आणि आघाडीच्या उमेदवारांना चिन्ह फिक्स असल्यामुळे फारसी चिंता वाटत नाही पण मनसेला तर याठिकाणी तीन चिन्ह मिळतील. त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यात आली. त्यावेळी 'आम्हालाच नेमके कोणत्या परिसरात कोणते मतदारसंघ येतात हे कळायला वेळ लागला तर लोकांना कोणते मतदारसंघ, काय वॉर्ड हे प्रश्न पडणं साहजिक आहे, असं मनसे शाखा अध्यक्ष अविनाश मयेकर यांनी सांगितलं. 149 क्रमांकाच्या या वॉर्डमध्ये 49 हजार मतदार आहेत. तीन मतदार संघात हा वॉर्ड विभागण्यात आल्यामुळे मतदानाच्या दिवशी नेमकं मतदान कुठे आणि कुणी करावं हे लोकांना समजावून देण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांना कसरत करावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2009 01:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2009 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close