S M L

लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2014 02:30 PM IST

rape sds

21   जुलै : लातूरमधल्या उदगीरमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला विष पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. उदगीर तालुक्यातल्या जायभायवाडीमध्ये ही घटना घडली.

पाण्याची टंचाई असल्यानं इथल्या महिला आणि मुलींना कपडे धुण्यासाठी रानावनातल्या पाणीसाठ्यावर जावं लागतं. ही मुलगीही अशीच कपडे धुण्यासाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हे आरोपी पीडितेच्या आळखीचे होते. घडलेला प्रकार तिने कुणाला सांगू नये, म्हणून या नराधमांनी तिला मारहाण करून, विष पाजवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close