S M L

पंतप्रधान मोदी देणार 'बीएआरसी'ला भेट

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2014 02:06 PM IST

narendra modi

21   जुलै :  मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. या भेटीत भारताच्या भविष्यातील अणू कार्यक्रमाबद्दल निर्णायक चर्चा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ भारताच्या आण्विक ताकदीची माहितीही पंतप्रधानांना करून देणार आहेत. त्याचबरोबर जैतापूर आणि कुडनकूलम येथील अणू वीज प्रकल्पांबद्दल पंतप्रधान काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण स्थानिकांचा विरोध असूनही मोदी यांनी या प्रकल्पांना सकारात्मक भूमिका दाखवलीय. त्याच बरोबर मुंबईतील डॉक्टर होमी भाभा यांच्या बंगल्याच्या स्मारकाबद्दलही पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न अणुऊर्जा आयोगातील कर्मचारी करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close