S M L

विधानसभेत पराभव होईल म्हणून पराभवात वाटेकरी नको -राणे

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2014 11:31 PM IST

विधानसभेत पराभव होईल म्हणून पराभवात वाटेकरी नको -राणे

21 जुलै : गेल्या चार दिवसांपासून 'कोकण वादळा'मुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. आज ठरल्याप्रमाणे नारायण राणे यांनी आपल्या उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. मी पक्षावर नाराज आहे, पक्षश्रेष्ठींनी मला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही, माझ्यासोबत आलेल्या माणसांना योग्य न्याय दिला नाही. मला मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊन ही ते पूर्ण करण्यात आलं नाही अशी नाराजी राणेंनी व्यक्त केली.

तसंच येणार्‍या विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विजय कठीण असून काँग्रेसचा पराभव अटळ आहे, या पराभवाचा मला वाटेकरी व्हायचं नाही म्हणून आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला असंही राणेंनी स्पष्ट केलं. राणे एवढ्यावर थांबले नाही त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला.

मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धत कमकुवत आहे, लोकांचे निर्णय तातडीने घेतले जात नाही अशी टीकाच राणेंनी केली. पण दुसरीकडे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राणेंनी तडजोडीचा मार्ग खुला ठेवला आहे. आपला राजीनामा अजून स्वीकारला नसून आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यानंतर पुढची दिशा ठरवणार असं सांगून राणेंनी अजून आपले खरे पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय तडजोड होते हे पाहण्याचं ठरेल.

 

राणेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती योग्य नाही, लोकांची काम होत नाहीत - राणे

लोकांची काम लवकर झाली पाहिजे- राणे

भ्रष्टाचार रोखण्यात अपयश प्रशासन सुस्त झाले आहे - राणे

निर्णयांची अंमलबजावणी होत नाही सरकार अपयशी ठरले - राणे

विधानसभेत काँग्रेसचा पराभव अटळ, मला वाटेकरी व्हायचं नाही -राणे

मी पक्षावर नाराज - राणे

गेल्या नऊ वर्षांत माझ्यासोबत आलेल्या माणसांना काहीच मिळालं नाही - राणे

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवणं कठीण - राणे

मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन पाळलं नाही - राणे

माझ्या माणसांना काहीच मिळालं नाही - राणे

सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद देतो असं दिलं होतं आश्वासन - राणे

माझ्या राजीनाम्यावर पक्षाध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय - राणे

मुख्यमंत्री संध्याकाळी भेटणार -राणे

काँग्रेस श्रेष्ठींनी आश्वासन देऊनही मुख्यमंत्री केलं नाही -राणे

पुढची दिशा राजीनामा स्विकारल्यानंतर - राणे

कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही आणि जाण्याचा विचारही नाही -राणे

सध्याच कुठल्या पक्षात जाण्याचा विचार नाही -- राणे

लोकसभेत पराभवाची जबाबदारी सामूहिक, आम्ही प्रचारात कमी पडलो - राणे

2009 ला प्रचार समितीचं प्रमुखपद आणि प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती - राणे

नवीन पक्ष काढणं किंवा दुसर्‍या पक्षात जाणं याचा आज तरी विचार नाही - राणे

शिवसेनेचे खासदार निवडणूक आले ही मोदींची कृपा - राणेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका

मी काँग्रेस संस्कृतीत रूळलोय - राणे

लवकरच राज्याचाही दौरा करणार, नागपूरपासून करणार सुरुवात - राणे

हे बंड नाही, मी फक्त भावना व्यक्त केल्या -राणे

आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार -राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close